Sunday, September 1, 2013

मत्स्यवेध:

मत्स्यवेध:

प्रसंग आहे स्वयंवराचा. स्थळ: स्पिती खोरे, हिमाचल प्रदेश.

अनेक युवराज, राजे सभामंडपात स्थानापन्न झालेले आहेत. स्वयंवराची सर्व तयारी झाली आहे. महाभारता प्रमाणे सभागृहाच्या मध्यावर “मत्स्ययंत्र” लावण्यात आलं आहे. राजांच्या मानाप्रमाणे त्यांना मत्स्य वेधाची संधी मिळणार होती. काही प्रौढ विवाहित राजे, काही नवे कोवळे राजकुमार तर काही असेच भटके.....सगळ्यांना संधी देण्यात आली होती.

      सगळ्यात आधी पुणे नरेश अण्णा परांजपे पुढे सरसावले. पुणे नगरातील एक मोठे प्रतिष्ठित प्रस्थ (थोडेसे विचित्र ही) धनुष्याला बाण लावला खरा; पण मग त्यांचे दुसरे “वैश्विक काळजी वाहू” मन म्हणू लागले, का बरे माशाचा डोळा फोडायचा आपण. किती हे हिंसक कार्य !! नाही नाही...हे चुकीचं आहे...त्यांनी बाण खाली घेतला...पण त्यांचं “नॉर्मल” मन काही शांत राहीना. शेवटी कोणाचंही लक्ष नाही असं बघून त्यांनी खिशातून आणलेला दगड काढून मारलाच माशाच्या डोळ्याला...नेम ही नेहमीप्रमाणे चुकलाच.

      त्या नंतर आले “रात्रीच्या मुंबई” चे निवासी राजे आशुतोष. चावट नरेश म्हणून प्रसिदधी असलेले आशुतोष नक्की काय करतात या वर सगळ्यांच लक्ष लागलं होतं. आल्या पासूनचं त्याचं लक्ष राजकुमारी सोडून पडद्याआड उभ्या असलेल्या राण्यांकडेच जास्त होतं. त्यांनी मागणी केली “महाराज, मी जर माशाचा डोळा फोडला तर या राजकुमारीऐवजी मी सांगेन ती राणी मला मिळेल का ??” ताबडतोब त्यांना बाहेर काढण्यात आले.

      मग आले मुलुंडवासी विनय राजे. कुलकर्णी कुळाचे सध्याचे वारसदार. खाण्याचे प्रचंड शौकीन; किबहुना “खादाड” असाचं लौकिक. आल्यापासून त्यांच लक्ष माशाकडेच लागलं होतं. त्यांनी राजांना सरळ सरळ प्रश्न टाकला “महाराज, माशाचा डोळा फोडण्या पेक्षा, मासा खाली उतरवावा, मीठ-मसाला लावून भाजून खाल्ला तर जास्त चांगला लागणार नाही का तो ??” ते ही हावरटपणामुळे असेच बाद झाले.

      त्या नंतर आले खातू राजे. आल्यापासूनचं त्यांना निघायची घाई झाली होती. समारंभाची मजा घेण्याचा त्यांच्या काही मनसुबा दिसला नाही. निघण्यासाठी सारखे चुळबुळत होते. त्यांनी ही राजांना प्रश्न टाकला “ महाराज, धनुक्ष- बाण वापरण्यापेक्षा मी माशाला “shoot” केलं तर नाही का चालणार ?”. हे नियमबाह्य होतं. त्यांना ही निघून जाण्यास सांगण्यात आलं.

     मग पाळी होती डोम्बिवलीच्या पाटील संस्थानाचे राजे प्रसाद यांची. आत्ताच काही दिवसापूर्वी राज्याभिषेक झाला होता. युद्धाची सवय आणि सराव दोन्हीही नाही. पण नशीब आजमावायला आले होते. त्यांनी प्रयत्न चालू केले. बराच वेळ बाण काही धनुष्यावर चढेच ना. त्यांचा नवशिकेपणा बघून त्यांना एकापेक्षा जास्त संधी देण्याचे महराजांनी ठरवले. धनुष्यातून निघालेल्या पहिल्याच बाणाने महाराजांच्या बाजूला उभ्या असलेल्या अंगरक्षकाचा वेध घेतला. दुसरा महाराजांच्या कानाला चाटून गेला. शेवटी प्रसाद राजांनी स्वतःहूनच तिथून पळ काढला.

      मग आले मकरंद राजे. त्यातल्या त्यात आधुनिक हत्यारे वापरणारे. ३-४ मोबाईल फोन कायम बाळगणारे. त्यांनी सुरुवात करण्याआधीच महाराजांना एक विनंती केली “ महाराज, हे असे माशाचे हाल करण्या ऐवजी, आपण मोबाईलवर एक application बनवू. त्यात सागळ्या राजांना login करून खेळता येईल. शेवटी ज्याचा online score जास्त असेल त्याला राजकुमारी देऊन टाका” त्यांनाही पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून देण्यात आलं.

      मग अगदीच ताजे ताजेच गुरुकुलातून परतलेले चॉकलेट राजकुमार प्रणव आपलं नशीब आजमावायला आले. हुशार गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध. पण व्यावहारिक हुशारीचा अनुभव कमी असलेले. गोंधळून गेलेले. धनुष्य उचलून बाण लावायला त्यांनी एवढा वेळ काढला कि सभामंडपातील अर्धे राजे झोपले. नेम लावायला काही जमलाचं नाही. शेवटी म्हणाले “आधी बाकीच्यांना मारुद्या, मग मी मारतो

      त्या नंतर त्यांचेच बंधू अमेय राजे आले. अतिशय चळवळ्या आणि धडपड्या स्वभाव. पण बुद्धीच्या वारश्यामुळे मुळातच हुशार. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. राजकुमारी घरी नेण्यात त्यांना एकूणच काही रस दिसत नव्हता. त्यांनी महाराजांना विनंती केली “महाराज, स्वयंवर संपल्यावर मला ते मत्स्ययंत्र द्या, मला ते कसं चालतंय ते बघायचंय.”

      मग त्यांचेच अजून एक बंधू हर्षद राजे, पांडुरंग वाडीचे राजपुत्र आले. शांतपणे धनुष्याला बाण लावून त्यांनी माशाचा डोळा फोडला. राजकुमारी तर मिळाली. पण तरीही राजांच्या reactions काहीच नाहीत.
      नेहमीप्रमाणे याही वेळेस राजे स्वतःच्याच धुंदीत हरवले होते.


पात्रपरिचय:
पुणे नरेश अण्णा परांजपे: प्रसन्न परांजपे, पुण्यामध्ये स्वतःची Priting-Press.
“रात्रीच्या मुंबई” चे निवासी राजे आशुतोष: आशुतोष साळवेकर, मुंबईमध्ये स्वतःची Priting-Press.
मुलुंड वासी विनय राजे: मुंबईमध्ये स्वतःची Priting Press (आशुतोष च्या चावट पणाचे भागीदार)
खातू राजे: किरण खातू, हे Medical Devisesच्या Business मध्ये आहेत.
डोम्बिवलीच्या पाटील संस्थानाचे राजे प्रसाद: प्रसाद पाटील, Data Analyst.
मकरंद राजे: मकरंद बेडेकर, हे एक Telecom Professional आहेत.
चॉकलेट राजकुमार प्रणव: प्रणव नाफडे, हे Brain Analysis करतात.
अमेय राजे: अमेय नाफडे, हे होऊ घातलेले Architect आहेत. अजून शिकत आहेत.
हर्षद राजे: हर्षद सामानगडकर, हे Mechanical Engineer आहेत.


कल्पना: विनय कुलकर्णी, आशुतोष साळवेकर आणि सगळ्यांची आगाऊ भर.

टीप: कथा काल्पनिक आहे. लिहिलेल्या कुठल्याही गोष्टी कोणीही personally घेऊ नयेत. ट्रीपमध्ये समोर आलेले हे फक्त प्रासंगिक व्यक्तिविशेष आहेत.